पांढऱ्या लसूणचे फायदे तर आपण सर्वजण चांगलेच जाणतो कारण पांढऱ्या लसूणाचा उपयोग आपण नेहमी रोजच्या जेवणामध्ये करत असतो पण तुम्हाला काळ्या लसूणाबद्दल माहिती आहे का? काळ्या लसूणाचा उपयोग खूपच कमी लोक करतात हेच कारण आहे कि अनेक लोकांना याचे फायदे माहिती नाहीत. चला तर जाणून घेऊया काळ्या लसूणाचे फायदे.

काळ्या लसूणाचे अदभुत फायदे :- 1) काळा लसूण पांढऱ्या लसूणाचेच एक रूप आहे जे फॉर्मेट करून बनवले जाते. हे पांढऱ्या लसूणाच्या तुलनेत कमी तिखट असते. यामध्ये पोषक तत्व पांढऱ्या लसूणाच्या बरोबरच असतात.
2) एलिसिन नावाचे पोषक तत्व पांढऱ्या लसूणाच्या बरोबरच काळ्या लसूणामध्ये असतात. हे ब्लड सरकुलेशन वाढवण्याचे, कोलेस्ट्रोल आणि हृदया संबंधित रोगांना कमी करण्याचे आणि इम्यूनिटी वाढवण्याचे काम करतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. याचबरोबर हे रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेण्यासाठी सुद्धा मदत करते.3) काळा लसूण फॉर्मेट प्रक्रियेद्वारे तयार केला जातो, ज्यामुळे यामध्ये युनिक अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये पॉलिफेनॉस, फ्लेवोनॉइड आणि अल्कलॉइडसुद्धा असतात.
4) काळा लसूण अनेक प्रकारच्या कर्करोग, रक्त कर्करोग, पोटाचा कर्करोग आणि कोलन कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरला जातो. याव्यतिरिक्त अॅठलर्जी कमी करणे, मेटाबॉलिजम वाढवणे, लिवरला कोणत्याही प्रकारच्या नुकसानपासून वाचवणे आणि मेंदूला निरोगी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.