आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात मनुष्याच्या भल्यासाठी अनेक नीतींचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. मनुष्याने जर या नीतिचा अवलंब केल्यास त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदी आणि सुखमय होते. आचार्य चाणक्यने एका श्लोकाच्या माध्यमातून अशा ६ प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले आहे कि जे आपल्या आयुष्यामध्ये कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. चला तर जाणून घेऊयात ते कोणते लोक आहेत.

श्लोक :- कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरभाषिणं च।
सूर्योदये चास्तमिते शयानं विमुञ्चतिश्रीर्यदि चक्रपाणि:।।

गलिच्छ कपडे परिधान केलेल्या व्यक्तीजवळ कधीच लक्ष्मी थांबत नाही. जे लोक नेहमी घाणेरडे राहत असतात, आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवत नाही, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि धनलक्ष्मीची कृपा होत नाही. त्याचबरोबर समाजालासुद्धा त्यांचा हा व्यवहार पसंत येत नाही आणि त्यांना सर्वांकडून अपमानाला सामोरे जावे लागते.या श्लोकामध्ये चाणक्य यांनी सांगितले आहे कि जो मनुष्य आपले दात नेहमी स्वच्छ ठेवत नाही अशा मनुष्याला गरिबीचा सामना करावा लागतो. माता लक्ष्मी अशा मनुष्याचा त्याग करते. त्याचबरोबर जो नियमित आपले दात स्वच्छ ठेवतो अशा मनुष्यावर लक्ष्मीची नेहमी कृपा असते.

चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जो मनुष्य आपल्या भुकेपेक्षा अधिक भोजन करतो असा मनुष्य कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती जर जास्त भोजन घेत असेल तर त्याचे आरोग्यहि चांगले राहत नसते.

ज्या लोकांच्या बोलण्यामध्ये गोडवा नसतो असे लोक कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत. चाणक्य यांनी असे सांगितले आहे कि आपल्या वाणीमुळे इतर कोणी दुखावत असेल तर असा लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. असे लोक शत्रूंनी नेहमी वेढलेले असतात.सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत झोपणारे लोकसुद्धा आयुष्यामध्ये श्रीमंत बनू शकत नाहीत. चाणक्य यांनी सांगितले आहे अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी कधीच राहत नाही. विनाकारण झोप घेणे खूपच हानिकारक असते. अन्यायातून, धूर्ततेतून किंवा बेईमानीतून पैसा कमावणारे लोक सुद्धा कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. अशा व्यक्ती लवकरच आपले कमावलेले धन गमावून बसतात.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.