आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की क्रिकेट मध्ये पैसे, आणि नाव दोन्ही खूप कमवता येते. आपल्याकडे क्रिकेट या खेळाला आणि क्रिकेट खेळणाऱ्यांना खूप मान दिला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही क्रिकेटर्स बद्दल सांगणार आहोत जे भारतासाठी मैदानावर क्रिकेट खेळतात आणि सरकारी नोकरी सुद्धा करतात. चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत असे खेळाडू.

उमेश यादव – उमेश ला भारतीय क्रिकेट टीम मध्ये खेळून तर पैसे कमावतो शिवाय रिजर्व बैंक ऑफ इंडिया तर्फे सुद्धा दर महा पैसे कमवतो. कारण उमेश सिस्टेंट मैनेजर ऑफ रिजर्व बैंक इंडिया म्हणून बँकेत काम करतो.
यजुवेंद्र चहल – भारतीय क्रिकेट टीमचा उत्कृष्ठ गोलंदाज असलेला यजुवेंद्र चहल हा क्रिकेट खेळाडू सोबतच इनकम टैक्स डिपार्टमेंट मध्ये इन्स्पेक्टर या पदावर काम करतो.
केएल राहुल – भारतीय क्रिकेट टीम मधील खेळाडू केएल राहुलला बीसीसीआई तर्फे सामना खेळल्यानंतर मोठी रक्कम मिळते. त्याशिवाय केएल राहुल रिजर्व बैंक ऑफ इंडियाचा असिस्टेंट मैनेजर सुद्धा आहे. तेथेही त्याला पगार म्हणून मोठी रक्कम मिळते.
कपिल देव – भारतीय क्रिकेट संघाला १९८३मध्ये विश्वकप मिळवून देणारे टीम इंडिया चे पूर्वीचे कॅप्टन कपिल देव यांना भारत सरकारने लेफ्टिनेंट कर्नल ही पदवी बहाल केली आहे. येथून त्यांना चांगले पैसे मिळतात.
सचिन तेंडुलकर – संपूर्ण जग ज्याला क्रिकेटचा देव मानतो अशा सचिन तेंडुलकरला भारतीय सरकारने ग्रुप कैप्टन ऑफ इंडियन एयर फोर्स बनवले आहे. या शिवाय सचिनच्या स्वतःच्या हॉटेलच्या चैन सुद्धा आहेत.
महेंद्र सिंग धोनी – भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आता आयपीएल च्या चेन्नई सुपर किंग संघाचा कॅप्टन आहे. याशिवाय भारत सरकारने धोनीला लेफ्टिनेंट इंडियन टेरिटरी आर्मीचे पद सुद्धा बहाल केले आहे.