सध्या भारतामध्ये हॉलीवुडप्रतिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हॉलिवूड कलाकारांचा भारतातील चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्यामधील एक कलाकार आहे टॉम क्रूज. टॉम क्रूज ची लोकप्रियाता तर पूर्ण जगभरात आहे. चित्रपटातील त्यांच्या ॲक्शन सीन मुळे व त्यांच्या डॅशिंग लूक मुळे चित्रपट सृष्टी त्यानी त्यांची एक वेगळी जागा बनवली आहे.
टॉम क्रूज नेत्याच्या करिअरची सुरुवात १९८१ मध्ये केली होती. तेव्हा ते अवघ्या १९ वर्षांचे होते. १९८६ मध्ये आलेला टॉप गन हा चित्रपट आमच्या आयुष्यातील पहिला हिट चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे टॉम क्रूजचे नशीब पालटले आणि त्यानंतर त्याने कधीच पाठी वळून बघितले नाही. टॉमने त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत ५६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ह्या आधी शेवटी टॉमला  मिशन इम्पॉसिबल फॉल आऊट या चित्रपटांमध्ये बघितले गेले होते. सध्या तो त्यांचा आगामी चित्रपट टॉप गन : मेवरिक च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा एक अँक्शनपट असून येत्या २६ जूनला तो प्रदर्शित होईल.
अभिनयाव्यतिरिक्त टॉम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. टॉमने त्यांच्या आयुष्यात तीन वेळा लग्न केले. परंतु तीन वेळा लग्न करून देखील आता वयाच्या ५७ व्या वर्षी सुद्धा ते एकटेच जीवन जगत आहेत. त्यांचे पहिले लग्न १९८७ मध्ये हॉलिवूड अभिनेत्री हॉलिवूड अभिनेत्री मिमी रॉजर्स सोबत झाले होते. परंतु हे लग्न तीन वर्षाच्या आतच तुटले. १९९९ मध्ये टॉमने त्यांच्या पहिल्या पत्नीस घटस्फोट देऊन त्याच वर्षी अभिनेत्री निकोल किडमैन सोबत दुसरे लग्न केले. पुन्हा २००१ मध्ये टॉम व निकोल विभक्त झाले. त्यानंतर टॉमने केटी होलमेस सोबत २००६ मध्ये विवाह केला पण ते लग्न सुद्धा २०१२ पर्यंतच टिकले. लग्न व्यतिरिक्त अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर टॉम क्रूज असल्याची चर्चा सिनेसृष्टीत अनेकदा रंगल्या होत्या.
टॉम क्रूज ला सर्वात जास्त प्रसिद्धी त्यांच्या मिशन इम्पॉसिबल या सिरीज मुळे मिळाली होती. या सिरीयस मुळेच त्याने भरपूर पैसा कमावला होता. आज त्यांच्या जवळ कशाचीच कमी नाही. एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार टॉम क्रूज तब्बल ४००० करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी तब्बल ४५० करोड रुपयांचे एक अलिशान घर विकत घेतले. त्यांच्याकडे जगभरातील महागड्या गाड्या व बाईकचे कलेक्शन आहे. शिवाय एक प्रायव्हेट जेट सुद्धा आहे त्याने ते विदेश दौरे करत असतात.