मित्रांनो तुमच्यापैकी अनेक जणांनी बऱ्याचदा चारचाकी गाडीने प्रवास केला असेल. गावाला जाताना किंवा सहलीला जाताना गाडीतून सफर करण्याची मज्जा वेगळीच असते. तुम्ही हा प्रवास केला नसेल तर एकदा जरूर करून बघा. काही लोकांना प्रवासाची खूप आवड असते. ते आपल्या जीवनातून वेळात वेळ काढून एका रोड ट्रिप वर जातातच जातात. तुमच्या पैकी अनेक जण असे असतील यात शंका नाही.

पण गाडीने प्रवास करताना मधेच तुम्हाला जाणवत कि काहीतरी गडबड होतेय. पोट मळमळायला लागतंय. श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतोय आणि डोकं हे जड होतंय. लवकरच समजत कि तुम्हाला गाडी लागतेय. म्हणजेच तुम्हाला उलटी होणार आहे. प्रवासा मध्ये हीच बाब बऱ्याच जणांच्या आड येते. आणि प्रवासाचा आनंद आपल्याला घेता येत नाही.

मग काय, चालकाला तुम्ही सांगता थोडी साईड ला घे रे गाडी! मग चालकाचा पण मूड ऑफ होतो आणि गाडी त्याला थांबवावीच लागते. थांबवली नाही तर तुम्ही गाडीत उल्टी करून मोकळे होता आणि गाडीत घाण होते ती वेगळी पण दुर्गंध ही येतो. पण असं काय होतं गाडीत बसल्यावर कि आपल्याला उल्टी होते. उल्टी होते म्हणजे खाल्लेलं वर येतं. तुम्ही म्हणाल गाडी हलत असते त्यामुळे शरीरातलं अन्न पण ढवळून निघतं आणि ते वर येऊन उल्टी होते. तुम्ही सुद्धा हे लॉजिक लावलं असेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर टक्के चुकलेला आहात!

तुमच्या प्रश्नाचा उत्तर आम्ही तुम्हाला देतो. शास्त्र मध्ये ह्याला “मोशन सिकनेस” नाव दिलं आहे. मोशन म्हणजे हालचाल आणि सिकनेस म्हणजे आजारपण. ह्याचाच अर्थ हालचाली मुळे येणारं आजारपण. हे आपल्याला विमान प्रवास, बोटीचा प्रवास आणि गाडीच्या प्रवासात येऊ शकते.

पण प्रश्न असा आहे कि हे मोशन सिकनेस येतो कसा?
ह्याचं उत्तर आहे डोळे आणि कानांचा सुटलेला किंवा न जमलेला ताळमेळ ज्याला काँ-फ्लिटिंग सिग्नल्स थेअरी असेही म्हणू शकता. तुम्ही विचाराल डोळे आणि कानांचा कसला ताळमेळ भाऊ? आता मला भाऊ म्हटले आहात तर सगळंच सांगतो.

गाडी सुरु झाल्या नंतर तुम्ही आरामात पाठ टेकून बसलेला असता. तुमचे डोळे गाडीच्या आतमध्ये असलेल्या सर्व गोष्टी बघत असतात अगदी ड्राइवर च्या सीट पासून ते बाजूला बसलेल्या माणसाकडे. गाडी तर चालू असते पण गाडीतल्या वस्तू गाडी बरोबरच पुढे जात असतात म्हणजेच फारशी काही मुव्हमेंट नसते. पण त्याच वेळी मात्र आपले कान सर्व काही ऐकत असतात. गाड्यांचा मागे जाणारा आवाज, हॉर्न आणि बरंच काही आपले कान ऐकत असतो आणि मेंदू कडे पाठवत असतो. त्याच वेळी डोळे सुद्धा आपली माहिती मेंदू कडे पाठवण्याचं काम करतात. आणि मग होतो मेंदू च्या डोक्याचा शॉट!

कान आणि डोळे हे दोन शिपाई आहेत त्यांचं काम असतं मिळालेली माहिती कमांड हेडकॉ-र्टर पर्यंत पोहोचवणे, हा कमांड हेडकॉ-टर म्हणजे आपला मेंदू. हा कमांड हेडकॉ-टर माहिती गोळा करतो आणि निर्णय घेऊन टाकतो. निर्णय आदेश असतात आणि सर्वच शिपाई त्या आज्ञे च पालन करतात. प्रवास करताना डोळे आणि कान वेगवेगळी माहिती देतात. डोळे म्हणतात हालचाल नाहीये. तर कान म्हणतात हालचाल आहे. ह्या दोघांचे सिग्नल बघून हेडकॉ-टर म्हणतो, दया, कुछ तो गडबड है! मग लगेच पोटासाठी आदेश निघतो… बाहेर काढा बाहेर काढा! पोट पण आदेशाचं पालन करतो आणि मग नको असलेलं घडतं. हे सर्व वाचल्या नंतर तुम्हाला २ प्रश्न पडले पाहिजेत. नाही पडले तरी चालेल कारण ते नाहीच पडले आहेत.

प्रश्न १ – कानाला हालचाल झालीये हे कसं समजतं?
हे समजून घेण्यासाठी आपल्याला बायोलॉजी च्या पुस्तकातला कानाचा डायग्राम बघावा लागेल. तुम्ही ह्या फोटो मध्ये पाहू शकता. कानाच्या आतल्या बाजूस एक व्हेस्क्युलर सिस्टिम असते ज्याच्या एका भागात लिक्विड असतं आणि दुसऱ्या भागात थोडेसे केस असतात. जेव्हा हालचाल होते तेव्हा लिक्विड हलतं आणि केसांवर आदळून केसांची पण हालचाल होते. ह्या वरून मेंदू ला हालचाल होत असल्याचं समजत.

प्रश्न २ – वेगवेगळे सिग्नल्स मिळाल्या नंतर मेंदू उलटी का करायला सांगतो?
ह्याचं हे उत्तर बरोबर असेलच असं नाही सांगता येणार. याचं कारण मनुष्याची उत्क्रांती ही होमो सेपि-यन्स पासून झाली. त्यांचं जीवन जास्त करून जंगलात गेलं तेव्हा गाड्या नव्हत्या पण नु रोटॉ क्सिन्स होते. नु रोटॉ क्सिन एक विष आहे जे खाण्या पिण्यात असतात. मेंदू ला अशे सिंग्नल्स मिळणे म्हणजे शरीरात नु रोटॉ क्सिन्स चा प्रवेश झाला आहे असं मेंदू ला वाटत म्हणजेच शरीरात विषाचा प्रवेश झाला आहे, मग मेंदू लगेच पोटाला सर्व बाहेर काढायला सांगतो आणि आपल्याला उलटी होते.

उल्टी होण्या पासून कसे वाचाल? वाचाल तर वाचाल ना! मग वाचा कि…
उत्तर सोप्पं आहे. बाहेर ही बघा. दूर पर्यंत जेवढी लांब नजर जाईल तेवढी बघा. तुमचे डोळे ही तुम्हाला थँक यु बोलतील. चालकाला उल्टी न होण्याचं कारण ही हेच आहे. चालक जे ऐकतो ते बघतो ही. हीच थिअरी ह्या उल्टी वर लागू होते . पण ही एक थिअरी आहे ह्याला सत्य किंवा असत्य मानणं हे तुमच्या हातात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.