माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते. असे मानले जाते कि ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा होते, त्याला कधीच आयुष्यामध्ये धनाची कमी जाणवत नाही. अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही आर्थिक समस्या येत नाहीत. अशामध्ये अनेक लोक माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात, पण त्यामध्ये ते सफल होत नाहीत.

जर दिवसरात्र मेहनत करूनदेखील तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या येत असतील, तर अशामध्ये तुम्ही काही उपाय करू शकता. या उपायांच्या मदतीने तुमच्या आर्थिक समस्या दूर होती. त्याचबरोबर तुम्हाला मेहनतीचे चांगले फळ देखील मिळेल.

जर तुमची इच्छा असेल कि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर देखील व्हावी तर सर्वात पहिला तुम्हाला हे जाणणे जरुरीचे आहे कि तुम्हाला स्त्रियांचा सन्मान करायला हवा. स्त्रियांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते, ज्या घरामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही, तिथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. याशिवाय ज्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत असतात तिथे देखील माता लक्ष्मी प्रवेश करत नाही.

तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आर्थिक समस्येचे कारण तुमच्या घराचा वास्तू दोष देखील असू शकतो. वास्तू दोषामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ लागतात, जसे पैशांचा अभाव, वादविवाद, मानसिक समस्या ई. अशामध्ये तुम्हाला वास्तुशास्त्राची मदत घ्यायला हवी. जर तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन कराल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि माता लक्ष्मीचा वास नेहमी राहील.या गोष्टीची जाणीव तर सर्वांनाचा आहे कि शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो, अशामध्ये जर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चना केल्यास आणि मातेचे व्रत केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल.

ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे कि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत स्थितीमध्ये आहे त्यांना कधीच आर्थिक समस्येतून जावे लागत नाही, त्यांच्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास राहतो. अशामध्ये तर तुम्ही शुक्र ग्रह मजबूत करून घेणार असाल तर आपल्या घरामध्ये एक मोरपंख अवश्य ठेवावे.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी साफ सफाईचे खूप मोठे योगदान असते. ज्या घरामध्ये साफ सफाई होत नाही, त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. दिवाळीला सुद्धा घरामध्ये साफ सफाई करण्याचे मुख्य कारण हेच मानले गेले आहे, जेणेकरून माता लक्षीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.