मुलगी तर घरची लक्ष्मी असते.घरात सूनेचे येणं म्हणजे लक्ष्मीचा येणं असं म्हटलं जातं आणि हे तुम्ही सर्वांकडून ऐकतात‌. आपल्या भारतीय संस्कारात मुलीला सुनेला नेहमी आदर सन्मान दिला जातो. मुलीला सुनेला घरची लक्ष्मी मानण्यात येते.जर तुम्ही त्यांची इज्जत करत नसाल अथवा त्यांच्यासोबत चुकीचे वागत असाल तर तुमच्या कुटुंबात खूप कठीण प्रसंग येतात. आर्थिक समस्याही जाणवतात. आणि हे काही प्रमाणात खरे आहे तुमच्यापैकी काही जणांना असे वाटते की ही बाब धर्म आणि अध्यात्माशी त्यांच्याशी निगडित आहे. म्हणजेच मुली आणि सुना या या लक्ष्मीचे स्वरूप असतात ही ही एक बोलण्याची बाब आहे. यात काही ही तथ्य नाही मात्र खरंच मुली आणि सुना या लक्ष्मी स्वरूपच आहेत आपण जाणून घेऊया त्याबद्दल.माता लक्ष्मी ही धनाची दैवता असते घरी पैसे येणे म्हणजे लक्ष्मी येण्यासारखे असते आणि पैसे जाणे म्हणजे लक्ष्मी जाण्यासारखे असते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की खऱ्याखुऱ्या आयुष्यात ही बाब कशी खरे ठरते. एक मुलगी किंवा सून कोणत्याही परिवाराची महत्त्वाचा आधारस्तंभ असते. जर ते घर तिचा आदर करत नसेल तर ती नाराज होते आणि नाराज झाल्यानंतर घर परिवार बरबाद होण्यास वेळ लागत नाही. तुम्हीही ही गोष्ट नोटीस केली असेल जेव्हा नवीन सून घरी येते तेव्हा घराची भरभराट पुण्यात सुरू होते याचं कारण लग्नानंतर मुलगा प्रगल्भ होतो. त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. अशावेळी तो आपल्या कार्यक्षमतेचा पेक्षा जास्त काम करतो. जास्त धन अर्जित करून कुटुंबाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. या आमूलाग्र बदलाचे कारण घरातील सून असते.

एक अजून कारण आहे जेव्हा घरात सून असते. तेव्हा घरातील मुलांचा घराचा ताण जबाबदाऱ्या त्यांच्यावर राहत नाही अशावेळी ते लोक जास्तीत जास्त धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्या दिशेने कार्य करतात सून आल्यानंतर मुलाला आपल्या जबाबदारीची जाणीव ती सतत करुन देत असते. त्याला कठीण प्रसंगी आधार देत असते, सतत त्याची सपोर्ट सिस्टिम म्हणून कार्य करत असते त्यामुळे मुलाची मानसिक पाठबळ पत्नी ही ताकद बनते. तर ज्या घरात सून नसते, त्या घराचा सर्व बॅलेन्स बिघडतो त्यांना मानसिक पाठबळ देणारच नसल्याने त्यांच्या मनांत निगेटिव्हिटी येते. ते डिप्रेशनमध्ये जातात त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते आणि आर्थिक समस्या सुरू होतात.‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे. आजच्या काळात आपण समाजात मुलींना पुरुषाच्या बरोबरीचे स्थान देतो हे खरच आहे. घरी मुलीचे योगदान खूप महत्त्वाचे असते अनेक जण असे मानतात. मुलांपेक्षा मुलीच आपल्या आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात मुलगी घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करते मुलांच्या तुलनेत मुलगी जास्त समजदार असते. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे आणि आपली मुलगी म्हणून जबाबदारी लक्षात घेऊन त्यांना आधार देण्याचे कामही मुलगीच करते.या सर्व कारणांमुळे घरी मुलगी आणि सुनेचा आदर सन्मान करा. कारण मुलगी सून ही तुमच्या घराची लक्ष्मी असतेच तसेच घराला घरपण देते. त्यामुळे फक्त धर्म आणि अध्यात्म यानुसार मुलगी सून घराची लक्ष्मी नसून प्रत्यक्ष जीवनात ती लक्ष्मी स्वरुपच आहे. प्रत्येक घरातली प्रमुख स्त्री ही त्या घरची गृहदेवता, गृहस्वामिनी, मालकीण असते. तिचं मोल ओळखून तिला तिचा सन्मान आणि प्रतिष्ठा ही त्या घरातील प्रत्येकाने आवर्जून द्यायलाच हवी. नव्हे तसे करणे हे कुटुंबातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे विसरून चालणार नाही.