लग्नानंतर मुली का होतात लठ्ठ? हि आहेत आश्चर्यचकीत करणारी मोठी कारणे !

5 Min Read

आजूबाजूला “हि” ची मुलगी लग्नानंतर लठ्ठ झाली..! “ती” ची सुन लग्नानंतर लठ्ठ झाली..! अशी कुजबुज आपणास नेहमी कानी ऐकू येत असते. त्यामुळे लग्नानंतर येणारा ‘लठ्ठपणा’ अनेकांच्या करमणुकीचा विषय होतो. लोकांना या लठ्ठपणाचे खूप आकर्षण सुद्धा असते, ते म्हणजे लग्नानंतर मुली खरच लठ्ठ का होतात? तर अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करणार आहे.

लठ्ठपणाचे सर्वात मुख्य कारण असे आहे कि, लग्नानंतर मुलींच्या जीवनशैलीत बदल होत असतो. लग्नाआधी मुली त्यांच्या खाण्या-पिण्यावर आरोग्यावर, शरीरावर विशेष असं लक्ष देत असतात. पण लग्नानंतर वाढत्या जबाबदारीमुळे मुली त्यांच्या शरीरयष्टीवर फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांचे वजन जलद गतीने वाढत जाते. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, मुली का लग्नानंतर होतात लठ्ठ? चला तर जाणून घेऊया लठ्ठपणा मागे असलेले प्रमुख कारणे.

१) हार्मोन्स मध्ये होणारे बदल :- वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना मुलींमध्ये अनेक प्रकारचे भावनिक आणि इतर हार्मोन्स बदल होत असतात. लैंगिक जीवनात सक्रिय राहणे देखील वजन वाढण्यास कारणीभूत आहे. याशिवाय ग’र्भ’धा’रणेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मुली बाजारात उपलब्ध असणाऱ्या ग’र्भ’नि’रो’ध’क गोळ्यांचे सेवन करतात. यामुळे शरीर लठ्ठ होऊ शकते.

२) हलगर्जीपणा :- लग्नाआधी मुली त्यांच्या दिसण्याकडे आणि वजनाकडे विशेष लक्ष देत असतात. तसेच नियमित व्यायाम पण करत असतात. परंतु लग्नानंतर मुली त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त होतात. इतरांची देखभाल करताना स्वतः ची काळजी घेणे त्यांना जमत नाही. जेवणाच्या बाबतीत योग्य वेळ न पाळणे, परिणामी शरीरासंबधित केलेला हलगर्जीपणा हा लठ्ठ होण्यास कारणीभूत ठरतो.

३) झोपेची कमतरता :- लग्नानंतर मुलींचे झोपेचे स्वरूप, झोपण्याचे वेळापत्रक बदलते. बदललेल्या जीवनशैलीमुळे मुलींना पुरेशी झोप घेण्यास मिळत नाही. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.

४) स्वतः च्या सवयीत झालेले बदल :- लग्नानंतर मुली स्वतःच्या सवयीत बदल करतात. सासरी गेल्यावर सासरची आप्तेष्ट मंडळी यांच्या वेळेप्रमाणे मुली स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या रीती परंपरा आ’त्म’सा’त करता करता स्वतःमध्ये कधी बदल होतो, हे त्यांनाच कळत नाही. या कारणास्तव त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे अशक्य होते. म्हणून वजन वाढण्यास सुरुवात होते.

५) नेहमी बाहेरचे खाणे :- नवविवाहीत जोडपे लग्नानंतर डिनर जेवण बाहेर खाण्यास जास्त पसंती देतात. हॉटेलमधील बाह्य पदार्थ खाण्याची शरीराला सवय होऊन जाते. कालांतराने बाहेरचे खाल्ल्याने शरीरात चरबी, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. आणि लठ्ठपणा येतो.

६) वय :- हल्ली मुले-मुली करीअरच्या नादात स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत तरुण मंडळी लग्नाचा विषय काढला, तर तो लगेच टाळतात. २८-३० वय वर्ष झाले, तरी लग्नाचा विचार करीत नाही. एका संशोधनानुसार वय वर्ष ३० नंतर शरीरात महत्वपूर्ण बदल होण्यास सुरुवात होत असते. शरीराचा मे’टा’बॉ’लि’क रेट कमी होत असतो. त्यामुळे शरीराचे वजन वाढते.

७) तणाव :- माहेर हे मुलींचे हक्काचे घर, ते सोडून लग्नांनातर सासरी जाणे. हे प्रत्येक मुलीकरीता अवघड असते. सासरी गेल्यावर नवीन लोकांमध्ये स्वतःला मिसळून घेणे. बहुतेकवेळा तारेवरची कसरत ठरते. तसेच सासरी नवीन घरात रमायला पण वेळ लागतो. या भीतीमुळे सुद्धा अनेक मुलींना ताण-तणावास सामोरे जावे लागते, त्याचा अप्रत्यक्ष परीणाम वजन वाढीवर होतो.

८) सामाजिक दबाव :- लग्नाआधी मुलींना घरच्या मंडळींकडून सुंदर, बारीक, फिट राहण्याचे सल्ले दिले जातात. आणि लग्नांनातर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. बहुतेकदा सामाजिक दबावामुळे मुलींना साधी राहणीमान स्विकरावी लागते.

९) गर्भधारणा :- गर्भधारणा हे महिलांचे वजन वाढण्यास महत्वाचे कारण ठरते. बहुतांश जोडपे लग्नांनातर फॅमिली प्लॅन आखतात. त्यांना एक किंवा दोन वर्षांनंतर बाळ हवे असते. बाळाच्या जन्मानंतर महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत नाही.

१०) नित्यक्रियांमधील बदल :- लग्नानंतर पती पत्नी यांना प्रेमळ क्षण एकमेकांसोबत घालवायचे असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट एकत्र करायची असते, म्हणजेच एकत्र बाहेर फिरणे, गप्पा मारणे, टीव्ही पाहत जेवण करण्यास आवडते. हे सुद्धा कारण लठ्ठपणा येण्यास कारणीभूत ठरतो. जर तुम्ही असेच एकमेकांसोबत क्षण व्यतीत करत असाल तर, रात्री जेवण झाल्यावर शतपावली करा. जेणेकरून दोघांच्या आरोग्यास ते उत्तम ठरेल. आणि एकमेकांना चांगला वेळ देत गप्पा मारल्यास मन शांत राहील.

११) अनुवांशिकता :-  बहुतेक वेळा लठ्ठपणा हा अनुवांशिकतेमुळे येण्याची शक्यता असते. अनुवांशिकता म्हणजे जर आई वडील लठ्ठ असतील तर त्यांचे होणारे बाळ सुद्धा लठ्ठ राहते. म्हणून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. लठ्ठ पणा कमी करण्याकरीता योग्य व्यायाम सकस आहार खा आणि योग्य वेळी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. तर हि आहेत काही प्रमुख कारणे, ज्यामूळे लग्नानंतर मुली होतात लठ्ठ ! असेच आरोग्यविषयक लेख वाचण्याकरीता आमच्या पेजला लाइक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *