लग्नानंतर बुधवारच्या दिवशी मुलीना माहेरून सासरी पाठवणे योग्य मानले जात नाही. असे म्हंटले जाते कि जर बुधवारच्या दिवशी मुलीला निरोप दिला तर ती एखाद्या दुर्घटनेची शिकार होऊ शकते. आपल्या शास्त्रामध्ये याचा उल्लेख करताना लिहिले गेले आहे कि असे केल्याने मुलीचे संबंध आपल्या माहेरच्या लोकांशी बिघडू शकतात आणि ती अपघाताची शिकार होऊ शकते. तर बुधवारच्या व्रत कथेमध्ये देखील बुधवारच्या दिवशी प्रवास करणे योग्य मानले गेले नाही.

बुधवारच्या दिवशी प्रवास करण्यासंबंधी आहे हि कथा :- बुधवार व्रत कथेमध्ये एका कथेचा उल्लेख केला गेला आहे. ज्यानुसार एक मधुसूदन नावाचा सावकार होता आणि त्या सावकाराचे लग्न संगीता नावाच्या मुलीसोबत झाले होते. एक दिवस संगीता आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी आपल्या माहेरी आली आणि काही दिवस तिथेच थांबली.

संगीताला आणण्यासाठी मधुसूदन संगीताच्या घरी आला आणि तिथे जाऊन त्याने संगीताच्या आईवडिलांना म्हंटले कि संगीताला आपल्यासोबत पाठवावे. त्यादिवशी बुधवार होता यामुळे संगीताच्या आईवडिलांनी त्या दिवशी संगीताला पाठवण्यास नकार दिला. पण मधुसूदन ऐकला नाही आणि तो त्याच दिवशी सांगितला घेऊन आपल्या घरी जाण्यास निघाला.

पण काही दूर गेल्यानंतर बैलगाडीचे एक चाक निघून पडले आणि ज्यामुळे ते दोघे चालत पुढे जाऊ आपल्या घरी जाऊ लागले. काही दूर गेल्यानंतर संगीता ठाकली आणि मधुसूदन तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला. पण जेव्हा मधुसूदन पाणी घेऊन संगीता जवळ परत आला तेव्हा त्याने पाहिले कि आपली पत्नी हुबेहूब आपल्यासारखेच दिसणाऱ्या एका व्यक्ती सोबत बसली होती.

त्या व्यक्तीला पाहून मधुसूदनला खूप राग आला आणि त्याने त्याला विचारले कि तू कोण आहेत? तेव्हा मधुसूदन सारख्या दिसणाऱ्या त्या व्यक्तीने सांगितले कि मी मधुसूदन आहे. हे ऐकल्यानंतर मधुसूदनला राग आला आणि त्याने त्याला मारण्यास सुरु केले. दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले आणि यादरम्यान तिथे काही शिपाई आले आणि त्यांनी मधुसूदन आणि त्याच्यासारख्या दिसणाऱ्या त्या व्यक्तीला बंदी बनवून राजा समोर आणले.

राजाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले पण राजा देखील त्यांचा निर्णय करू शकला नाही कि दोघांपैकी खरा मधुसूदन कोण आहे? राजाने बराच वेळ विचार केला आणि निर्णय घेतला कि या दोघांनाहि जेलमध्ये टाकावे. राजाचा हा निर्णय ऐकून मधुसूदन घाबरला. तर काही वेळाने आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितले गेले कि तू संगीताच्या आईवडिलांचे ऐकले नाहीस आणि बुधवारच्या दिवशी आपल्या पत्नीला सासरी आणायची चूक केलीस.

यामुळे तुझ्यासोबत हे होत आहे. आकाशवाणी ऐकल्यानंतर मधुसूदनने देवाची माफी मागितली. मधुसूदनने माफी मागताच त्याच्यासारखा दिसणारा तो व्यक्ती गायब झाला. तर मधुसूदनसारखा दिसणारा व्यक्ती दुसरा कोणीही नव्हता तर बुधदेव होते.

म्हणूनच अशी मान्यता आहे की बुधवारी मुलींना सासरी पाठवू नये. बुधवारी आणखी काही अशी कामे आहेत जी कामे केल्याने त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कमी होते. तसेच व्यक्तीचे शत्रू देखील वाढतात आणि आपल्या मुलींचे सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात, कदाचित त्यांच्यामध्ये भांडणे वाद-विवाद होवू शकतात. या सर्व कारणांसाठी आणि या समस्या टाळण्यासाठी बुधवारी अशी कामे केली जात नाहीत.

तसेच आपल्या आई बहिण समान मुलींचा बुधवारी कधीही अपमान करु नये. असे केल्याने बुध ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीत खराब होईल. असे केल्याने तुमची बौद्धिक क्षमता कमी होईल. म्हणून बुधवारी आपल्या आई आणि बहिणी समान असणाऱ्या महिलांना कपडे साडी किंवा हिरव्या बांगड्या दान केल्या जातात.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.