मधू व कैठक या असूरांचा वध केला ती महाकाली देवीचा हा पहिला आवतार होता. देवीने महिषासुर दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला हा देवीचा दुसरा होता. महालक्ष्मी शुभ आणि अशुभ या दोन शक्तीवान दैत्‍यांना ठार मारले हा तिसरा अवतार महासरस्वती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा तीन रूपात प्रकट होऊन तीन वेळा दैत्यांचा संहार करून स्त्रीशक्तीने देवांचे रक्षण केले. तेव्हा देवांनी देवीचे स्तवन केले देवी आनंदित होऊन म्हणाली शरद ऋतूत नवरत्नात माझे महात्म्य आणि युद्धातील माझे पराक्रम जे श्रवण पठन करतील माझे मनोभावे पूजन करतील त्यांचे शत्रू नष्ट होतील. त्यांची सर्व पीडा दूर होईल त्यांचे कल्याण होईल त्यांचे कुळ आनंद पावेल. देवीने सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव सर्व भारतात आजपर्यंत चालू आहे. नवदुर्ग ही अद्य शक्‍ती सत्व रज तम या गुणांच्या द्वारे अनुक्रमे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा तीन रुपात अविर भूत होते. यातील प्रत्येकाची तीन तीन रूपे मिळून एकंदर नऊ रूपे होतात.

नऊ हे स्त्रीशक्तीचे अंक प्रतीक आहे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री हे प्रसंग पास स्त्रीशक्तीने घेतलेले नऊ अवतार म्हणून तिला नवदुर्गा म्हणतात. दुर्गादेवीचा नववा अवतार आहे युद्धाच्या प्रसंगी जय मिळावा म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्गा स्तोत्र म्हणायला सांगितले. अर्जुनाने रथा वरून खाली उतरून दुर्गा स्तोत्र म्हटले. श्रीकृष्णाने वृंदावनात दुर्गेची प्रथम पूजा केली दुर्वासा च्या शापाने ऐश्वर्य भ्रष्ट झालेल्या इंद्राने ईश्वरप्राप्तीसाठी दुर्गेची आराधना केली. राम आणि रावण यांच्या युद्धाचे प्रसंगी रावणाचा वध होऊन रामाचा विजय व्हावा म्हणून ब्रह्मदेवाने दुर्गेचे स्तवन केले. युद्धाला जाताना रामाने दुर्गेचे पूजन व प्रार्थना केली. भगवती दुर्गेच्या त्रिगुणात्मक शक्तीची तीन रूपे आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तरी महिषासुरमर्दिनी हे तिचे रूप विख्यात आहे. देवीचे असुर शक्तीची नऊ दिवस युद्ध चालले होते. दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. ह्याच दिवशी रामाने रावणाशी युद्ध करून त्याच्या दहा शिरांचे छेदन केले. म्हणून या दिवसाला दशहरा असे नाव पडले. पुढे या शब्दाचे रूप दसरा असे झाले. विजयादशमी हा देशाचा सैनिकी सण आहे. शौर्य संपत्ती आणि विद्या देणारा या दुर्गेच्या वर्दानाचे प्रतीक म्हणून विजयादशमीला अतिशय महत्त्व आहे रुपंदेही, जयंदेही, यशोदेही अशी दुर्गेची प्रार्थना करतात. संकटावर मात करता यावी म्हणून दुर्गेची आराधना करतात. निश्चित फळ प्राप्त व्हावे म्हणून दुर्गेची उपासना करतात. दुर्गापूजा शक्तिपूजा आहे या शक्ती तच ईश्वराचे रूप आहे.नवरात्र व्रत अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस करण्याची प्रथा पौराणिक काळापासून असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आलेला आहे. प्रतिपदेच्या दिवशी सगळीकडे देवीची स्थापना करतात. नऊ दिवस पर्यंत नवरात्र असते. दुर्गेची पूजा अनेक कुटुंबात होत असते. दुर्गा ही अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे पहिल्या दिवशी घटस्थापना करतात म्हणजे एका तांब्याच्या कळसावर किंवा मातीच्या घटावर पूर्णपात्र ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व त्यांच्या अनेक परिवार देवता यांची स्थापना करतात. घटाच्या बाजूलाच नवे धान्य रुजत घालतात. व ते रुजवण नवरात्र उत्सव समाप्तीनंतर केसांच्या अंबाड्यात किंवा विनीत मानतात घटस्थापनेच्या वेळी लावलेला नंदादीप अखंड दीप विसर्जनापर्यंत पेटत ठेवावा. या नऊ दिवसात देवी महात्म्य देवी कवच सप्तशतीचा पाठ पठण व श्रवण करावे. काही ठिकाणी नऊ दिवस उपवास करतात तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठवण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. नवरात्रात सुवासिनींना कुमारिकांना घरी जेवायला आमंत्रित करतात. एका दिवशी एका सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरतात. नवरात्रात मंदिरात जाऊन देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. नऊ दिवस देवीच्या घटावर कारल्याच्या किंवा सुगंधी फुलांची माळ सोडतात.

या नवरात्र उत्सवात काही दिवस विशिष्ट व्रताचे व आराधना यांच्या असतात. शुद्ध पंचमीला उपांग ललिता देवीचे व्रत असते. ललितापंचमी सायंकाळी पापड्या करंज्या बोरवडे वगैरे फुलोरा घाटावर टाकतात पंचमीला ललिता देवीची पूजा करून महाप्रसादासाठी भक्तांना बोलतात धर्म आहे कुंकवाचा करंडा घेऊन त्याची ललितादेवी म्हणून प्रतीकात्मक पूजा करतात व पुष्‍पगंध आणि 48 दुर्वा ललितादेवी लावण्याची परंपरागत रूढी आहे पंचमीला कुंकुमार्चन म्हणजे कुमारिका आणि सुहासिनीं कडून देवीला कुंकू वाहतात बरोबर दुर्वा फुले वाहून देवीला नैवेद्य दाखवतात. नंतर देवीची आरती करतात. घरात सदैव मंगल वातावरण हवे यासाठी सौभाग्य रक्षणासाठी सुवासिनी देवीला कुंकू लावतात. महालक्ष्मी व्रतांग पूजा नवरात्रात अष्टमीला करतात महाराष्ट्रात चित्पावन ब्राह्मण समाजात हेवत प्रचलित आहे लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे ह्या महालक्ष्मीची पूजा सुवासिनी मोठ्या उत्साहाने करतात. या दिवशी सकाळी देवीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवून पूजा करतात. आरती करतात रात्री तांदळाच्या पिठाने महालक्ष्मीचा मुखवटा करून तिची पूजा करतात. ज्‍यांच्या घरी ही पूजा असते त्यांच्या घरी सुवासिनी देवीची पूजा करण्यासाठी जातात. रेशमाचा सोळा पदरी दोरा घेऊन त्याला गाठी मारतात. पहिले वर्ष असेल तर एक गाठ पाचवे वर्ष असेल तर पाच गाठी असा तातू तयार करतात हा दोरा पूजीकेने आपल्या हातात बांधायचा असतो. हा दोरा दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्ती विसर्जनाच्या वेळी देवीपुढे ठेवायचा असतो देवीची मूर्ती तयार झाल्यावर प्राणप्रतिष्ठा करून पूजा करतात पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचू लागतात दुसर्‍या दिवशी सूर्योदयापूर्वी पंचोपचार पूजा करून आरत्या मंत्रपुष्प प्रार्थना इत्यादी करून विसर्जन करतात. अश्विन शुद्ध नवमीला खंडेनवमी किंवा खंडेनवमी असेही म्हणतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा करण्याची चाल आणि कुटुंबात आहे. विजयादशमीला श्री सरस्वती पूजन करण्याचा प्रघात आहे. लहान मुलांना प्रथमच पाठीवर श्रीगणेशा ही अक्षरे गिरवायला लावतात. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक चांगला मुहुर्तआहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नऊ दिवसात त्याच्या घरी नवरात्र उत्सव असतो ते चुलीवर तवा ठेवत नाहीत भाकरी किंवा पोळी या नऊ दिवसात भाजायची नाही असा नियम प्रत्येक कुटुंबात पाळण्यात येतो.

हवनासाठी कोहळ्याचा बळी देण्याचा प्रकार सर्वत्र रोड आहे नवरात्र पूजा घटावर मंडप बांधून त्याखाली विविध फुलांची माळ लोंबती बांधणी हा एक महत्त्वाचा विधी आहे. की ते कुटुंबात हि माळा चढती असते म्हणजे पहिल्या दिवशी ये दुसऱ्या दिवशी दोन तर तिसर्‍या दिवशी तीन याप्रमाणे नवव्या दिवशी नऊ माळा बांधतात. साधु-संत व सज्जनांचा छळ करणाऱ्या असूर शक्तीचे निर्मूलन देवी भगवतीने निरनिराळे अवतार घेऊन केले आणि देव व मानव यांचे रक्षण केले तेव्हा देवीची मूर्ती जागवण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्‍याचे तोरण बांधतात नवरात्र जागून सर्वजण देवीची आराधना करतात. देवी सर्वांची इच्छा पूर्ण करते देवीचे महात्म्य सर्व पुराणातून वर्णन केलेले आहे. देवीच्या प्रसादाने मनुष्य सर्व बाधेतून मुक्त होऊन धनधान्य व पुत्र संगतीने संपन्न होईल यात अजिबात शंका नाही.