खंडेनवमी म्हणजे खरं तर घटस्थापने मधला नववा दिवस म्हणून त्यास नवमी म्हणजेच खंडेनवमी असे म्हटले जाते. सर्वच लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांची पूजा करण्यात येते. खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रांचे पूजन करण्याची परंपरा आहे.
या दिवशी घरातील शेतीचे साहित्य किंवा पुस्तके किंवा इतर महत्त्वाचे आर्थिक सौख्य लालाभवून देणारे साहित्य याचे पूजन झेंडूचे फुले वाहून केले जाते. या दिवसाला इतिहासामध्ये तसेच भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे. अलीकडे बदलत्या काळानुसार सर्व लोक आपल्या आपल्या व्यवसायाप्रमाणे वस्तूंचे पूजन करत असतात जसे की डॉक्टर असेल तर स्टेथॉस्कोप, शस्त्रक्रियेची अवजारे, विद्यार्थी असेल तर पुस्तक किंवा इतर शेतकरी वगैरे असतील तर ते शेतीची अवजारे वगैरे यांचे पूजन करतात. नवरात्री मधलं नववा दिवस असल्यामुळे तुला खंडेनवमी असं म्हणतात.
या नंतर येतो तो दहावा दिवस यालाच म्हटलं जातं विजयादशमी, अर्थात दसरा या दिवशी आपट्याची पान सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. आणि त्यांनतर घटस्थापणा उत्सवाची सांगता होते.